न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- शिवसेनेच्या नगरसेविका रेखा दर्शिले यांची शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली होती. परंतु, त्यांनी तत्काळ महासभेत राजीनामा दिला.
दर्शिले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळले. तसेच पक्षांतर्गत काही वाद नसल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. प्रत्यक्षात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यातील अंतर्गत वादातून राजीनामानाट्य रंगल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.











