न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- वाल्हेकरवाडी येथील भोंडवेनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
येथील सर्व्हे नं. १२०, १२१ मधील एकवीरा कॉलनी, नंदनवन कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी आणि इतर रहिवासी परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे.
याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे येथील रहिवाशांनी वारंवार तक्रारी दिल्या आहेत. त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्याने रहिवासी नाराज आहेत.
दिवसाआड एकदा येणारे पाणी; परंतु त्या पाण्याला दाब नसल्यामुळे इमारतींच्या टाक्या भरत नाहीत. गैरसोयीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. तरीही जेथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, तेथील उणिवा शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यात येतील. परिसराला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल.
– प्रवीण धुमाळ, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ब प्रभाग…











