न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- सांगवी पोलिस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळापासून चोरीस, अपघातग्रस्त, तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने पडून आहेत. या वाहनांमुळे अगोदरच जागेची कमतरता असलेल्या सांगवी पोलिस ठाण्याच्या परिसरात अडथळा निर्माण झाला आहे. बेवारस वाहनांमुळे कर्मचाऱ्यांना दुचाकी लावण्यासही जागा शिल्लक नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
वाहनांची यादी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. पंधरा दिवसांच्या मुदतीत वाहने घेऊन न गेल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जाईल. त्यामुळे कागदपत्रांसह ओळख पटवून देऊन ही वाहने लवकरात लवकर घेऊन जावीत, असे आवाहन सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन शिर्के यांनी केले आहे.











