न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- कामातून मिळालेले पैसे एकाकडे ठेवण्यासाठी दिल्यानंतर तो परत करत नसल्याने युवकाने त्याच्या घरासमोरच जाळून घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील दुर्गानगर झोपडपट्टी येथे घडली.
संदीप बैसाने (वय-२८ रा. बामणे ता. सिंदखेडा जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सतिश बैसाने (वय ३६) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मंगल बापू अव्हाड (वय ३८ रा. दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी लागलीच त्याला अटकही केली आहे.











