न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- तब्बल ५० हजार विविध रंगाचे रुमाल करण्यात येणार आहे. त्यासाठी ५५ लाख १२ हजार ५०० रूपये खर्च केला जाणार आहे.
महापालिका कामकाजाच्या फाइल्स आणि कागदपत्रांची गड्ढे बांधण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या टेबलवर मोठ्या प्रमाणात फाइल्सचे ढीग असतात. या शेकडो फाइल्स कशा ओळखायच्या यासाठी विविध रंगाच्या रूमालामध्ये त्या गुंडाळून ठेवल्या जातात.
अधिक महत्त्वाची, मध्यम महत्त्वाची, नियमित, कमी महत्त्वाच्या फाइल्स त्या त्या रंगांच्या रूमालात बांधून ठेवल्या जातात. ती महापालिकेची जुनी परंपरा आहे. त्यात अद्याप खंड पडलेला नाही.
एका रूमालाची किमत आहे ११० रूपये २५ पैसे इतकी आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता थेट महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून ते रूमाल खरेदी करण्यात येणार आहेत. ही खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून करण्यात येत आहे.
खरेदीनंतर हे रूमाल सर्व विभागास वितरीत केले जातील. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.














