- महापालिकेच्या करसंकलन विभागात मुदत संपूनही कर्मचारी ठाण मांडून आहेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- करसंकलन विभागात २४१ कर्मचारी आहेत. त्यातील २६ कर्मचाऱ्यांचा सहा वर्षांचा, दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तरीही त्यांची बदली झालेली नाही.
महापालिकेच्या करसंकलन विभागातील या कर्मचाऱ्यांचा संपला कार्यकाल…
अभिषेक पाटोळे, विकास काळजे, राहुल चावरिया, संतोष सुर्वे, शंकर कानडी, विशाल उगवेकर, रंगनाथ नाईक, दीपक सरवदे, वैशाली पाडेकर, सुनीता रावडे, संतोष बांदल, हनुमंत जाधव, सनी पवार, दिलीप वाघमोडे, संजय गरगरे, शरद जाधव, अनिल कुदळे, उर्मिला गभाले, दत्तात्रय सातव, अरूण चौधरी, विजयकुमार तिटकारे, सुनंदा बांगर, मोहन मोटे, भास्कर खंडे, किरण गव्हाणे, सचिनकुमार शिंदे.
मला या विभागात येऊन अल्पसा काळ झाला आहे. बहुतांशी कर्मचाऱ्यांची नावेही मला माहीत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार प्रशासन विभागाकडे आहेत. याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त – कर संकलन विभाग…

















