न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या तळेगाव, देहूगाव दरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवा अपुरी होती. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पीएमपीच्या वाहतूक विभागाच्या वतीने सर्वे करण्यात आला. त्या अनुषंगाने या मार्गावर आठ फेऱ्या वाढवलेल्या आहेत.
पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस वाढल्या आहेत. त्यानुसार पुणे, तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्येदेखील मार्ग वाढवण्यात आलेले आहेत.
पीएमपीएमएलचा बसमार्ग क्रमांक ३३० आळंदी ते तळेगांव दाभाडे संचलनात आहे. तथापि तळेगांव दाभाडे ते देहुगांव दरम्यान बसेस व फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. त्यानुसार २९ मार्चपासून बसमार्ग क्रमांक ३३० आळंदी ते तळेगाव दाभाडे या मार्गावरील बसेसना तळेगाव दाभाडे ते देहुगांव अशा ८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.











