न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त महेश वाघमोडे यांच्याकडे असलेला ह क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार बदलण्यात आला आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाची आहरण व संवितरण अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, समाज विकास व झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचा आहरण व संवितरण अधिकार पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. तर, सहाय्यक आयुक्त सचिन पाटील यांच्याकडे समाज विकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.











