न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- मोशी येथील श्री नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टवर निरीक्षक प्रज्ञा कांबळे यांची मंगळवारी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी दिले.
येथे श्री नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आहे. दरवर्षी पंचक्रोशीत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो. येथे कोट्यवधींची उलाढाल होत असते.
येथील ट्रस्टमध्ये सुरू असलेला आर्थिक गोंधळ व कारभारातील अनियमितता याबाबत न्यासाचे सहसचिव प्रकाश बोराटे व सभासद प्रशांत सस्ते यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.














