न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २९ मार्च २०२५) :- श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज विकास प्रतिष्ठाणच्या वतीने देहूच्या चिंचोली गावातील ओम श्री शनेश्वर मंदिरात शनि आमवस्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिवसभर शनिदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटेच्या सुमारास श्री शनि महाराजांना अभ्यंगस्नान आणि त्यांची नित्य महापुजा व आरती करण्यात आली. लघुरूद्र महाअभिषेक आणि सकाळी श्री सत्यनारायण महापुजा तसेच साडेसाती ग्रहदशा, पीडा निवारणसाठी तेवीस हजार शनि महामत्रांचा महायज्ञ (होमहवन), भजनसेवा, अखंड महाअन्नदान (भंडारा), छप्पनभोग प्रसाद सेवा आणि तसेच कीर्तन सेवा आणि सायं. श्री शनिदेवांच्या महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
हिंदू धर्मात शनि अमावस्या खूप विशेष मानली जाते. शनिदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी शनिदेवाची पूजा करतो, त्याचे सर्व संकटे दूर होतात.















