न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- देहूगाव येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड झाली. विश्वस्तपदी आबाजीबुवा शाखेतून दिलीप मोरे व लक्ष्मण मोरे, गणेशबुवा शाखेतून उमेश मोरे, गणेश मोरे तर गोविंदबुवा शाखेतून विक्रमसिंह मोरे व वैभव मोरे हे निवडून आले आहेत. अध्यक्षपद हे दोन वर्षांसाठी गोविंदबुवा शाखेतील जालिंदर मोरे यांच्याकडे राहील.
संस्थानच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार उभे होते. जालिंदर मोरे यांना १६३, कैलास मोरे यांना ८३ मते व विश्वजीत मोरे यांना १०७ मते मिळाली. या निवडणुकीसाठी एकूण ३७७ मतदारांपैकी ३५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुकीत ९४.४१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश महाराज मोरे यांनी दिली. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शामकांत महाराज मोरे, सुजित महाराज मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
निवडणुकीत आबाजीबुवा शाखेत एकूण ८९ मतदार होते. पैकी ७९ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आबाजीबुवा शाखेतून सहा उमेदवार विश्वस्त पदासाठी उभे होते. त्यात लक्ष्मण मोरे (३६ मते), विक्रम मोरे (२३ मते), अमोल मोरे (३४ मते), भास्कर मोरे (१६ मते), दिलीप मोरे (३६ मते), जयवंत मोरे यांना ९ मते मिळाली आहेत.
गणेशबुवा शाखेमधून १४१ मतदार आहेत. पैकी १३७ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गणेशबुवा शाखेमधून सहा उमेदवार उभे होते. उमेश मोरे (६९ मते), गणेश मोरे (७८ मते), अजित मोरे (२८ मते), सचिन मोरे (१३ मते), श्रीराम मोरे (४३ मते) व धनंजय मोरे यांना ३९ मते मिळाली.
अध्यक्षपदासाठी दोन मते बाद
गोविंदबुवा शाखेत सर्वाधिक मतदान म्हणजे १४७ मतदान असून पैकी १३९ मतदारांनी मतदान केले. गोविंदबुवा शाखेतून सात जणांनी विश्वस्त पदासाठी अर्ज भरलेले होते. विक्रमसिंह मोरे (५३ मते), अशोक मोरे (४२ मते), वैभव मोरे (५० मते), संजय मोरे (४२ मते), विवेक मोरे (२९ मते), रोहन मोरे (३४ मते), जयसिंग मोरे यांना २० मते मिळाली आहेत. अध्यक्ष पदासाठी दोन मते बाद झाली, तर एकूण १८ मते बाद झाली.















