- “महिला सुरक्षा सप्ताह” अभियानाची सुरवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय सुद्धा वेगाने हालचाल करत असून शहरात नवीन पोलीस ठाणे सुद्धा निर्माणाधिन आहेत. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने आकुर्डी गंगानगर येथे महिला सुरक्षा अभियानाची आज सुरुवात झाली. या प्रसंगी निगडी पोलीस ठाण्याच्या सहा.पोलीस निरीक्षक वैशाली असगेकर सावंत प्रमुख होत्या.
या प्रसंगी त्या म्हणाल्या आकुर्डी – गंगानगर परिसरात कामगार व श्रमिक कुटुंबांची संख्या जास्त असल्याने ह्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची शाखा आजपासून कार्यरत होणे महिला सक्षमीकरणासाठी योग्य पाऊल आहे.महिला सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कायम दक्ष आहे. निगडी – आकुर्डी हद्दीतील समितीच्या माध्यमातून आलेले महिलांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील.”
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, धनंजय काळभोर, महेश काटे, महिला सामाजिक कार्यकर्त्या दीपा काटे, श्रीमंत जगताप,सचिन बागल, चंद्रमणि जावळे, शामराव सूर्यवंशी,प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील, विजय मुनोत , विभाग प्रमुख रुपाली भालेराव, संघटक उमेश देशमुख यांची होती.
महिला सुरक्षा अभिनयाच्या शहर संपर्क प्रमुख म्हणून उर्मिला देशमुख,चित्रा कोठावदे,कांताताई सोनवणे,गौरी सरोदे, प्रतिभा कांबळे, शीतल नारखेडे, चारुशीला चौधरी,वर्षा भारंबे,ललिता झांबरे,प्रियंका जगताप,उज्वला जगदाळे, वर्षा भोसले, रेखा सोनवणे, जयश्री मनकर,विद्या परमार,गायत्री घरथ, अनुराधा वाघचौरे,तेजल भैरवकर, सविता शिंदे या कार्यरत आहेत. या प्रसंगी समितीच्या वतीने एसपीओ व पोलीस मित्रांच्या ओळ्खपत्राचे वाटप करण्यात आले.
माजी उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या,” महिला सुरक्षा अभियानाने महिलांनमध्ये असंणारी असुरक्षिततेचि भावना वाढीस लागनार नाही.महिला पोलीस मित्रांची समिती आकुर्डी प्रभागात पोलीस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी तत्पर असणार आहे.प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्य मी अनेक वर्षांपासून पहात असून त्यांचे कार्य समाजासाठी अतुलनीय आहे.”
सामाजिक कार्यकर्ते महेश काटे म्हणाले,” आकुर्डी गंगानगर परिसरात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने नागरिकांच्या समस्यांच्या आलेखही दिवसेंदिवस वाढत आहे. या करिता आज स्थापन झालेली “पीएनएसकेएस” स्वयंसेवकांची शाखा नागरिकांना सुरक्षा देण्यास कार्यरत असेल.”
कार्यक्रमाचे आयोजन प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विभाग अध्यक्ष राम सुर्वे, विशाल शेवाळे, सतीश देशमुख, संतोष चव्हाण, संदीप कुंबरे, राजेंद्र कुंवर, संदीप कांबळे, धीरज नारखेडे,किरण चौधरी, उद्धव कुंभार, रवींद्र पवार , तेजस सकट यांनी केले
कार्यक्रमास विशेष सहकार्य व श्रम निखिल कुमावत, भरत उपाध्ये, संतोष ढमनगे, निखिल ढमनगे, प्रशांत जमदाडे, सातप्पा पाटील, गणेश फाळके, नितीन कराळे, विठ्ठल पाटील, विजय चौगुले, शिवराम बालघरे, सचिन गावडे, किशोर कदम, नामदेव गाडे,योगेश जाधव,मनीष जांभळे,रविंद्र जांभळे, शेख अयुब अब्बास, सुनिल घोडेकर बाबुराव खोटे, विठ्ठल यादव, अरुण रामटेके,रोशन हांडे, संजय गोरखा, विकास जगताप,संजय पुंड, सुरेश बोबडे,शांताराम दरकुंडे, राजेश सुरसे, उमेश गायकवाड,सुजितकुमार साळुंखे, अजय टोपे,सुरेश वायकर,सारंग कसबे,संतोष रांजणे, शत्रुघ्न धुरडे,संतोष पवार,विजय जगताप, जयेंद्र मकवाना, देवजी सपरिया यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएनएसकेएस समिती राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील यांनी केले.सूत्र संचालन रुपाली भालेराव यांनी केले.











