न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड शहराचा गुरूवारचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. ०४) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.











