- शासनाच्या आणखी एका अधिकाऱ्याची महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२५) :- महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या पदावर राज्य शासनाच्या तृप्ती सांडभोर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राज्य शासन अन्याय करत असल्याची भावना अधिकारी व्यक्त करत आहेत.
महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत. यामध्ये दोन पदे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरली जातात. एका पदावर महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदभार दिला जातो.
सद्यस्थितीत अतिरिक्त आयुक्त ३ या पदाचा पदभार सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे आहे, तसे असताना या पदावर राज्य शासनाने महापालिकेतील अधिकारी पदोन्नतीने मिळेपर्यंत किंवा दोन वर्षे कालावधीसाठी सांडभोर यांची नियुक्ती केली आहे.
सांडभोर या नगरपरिषद संचालनालयाच्या प्रशासन आयुक्त तथा संचालक होत्या. आता त्यांची महापालिकेत वर्णी लागली आहे.












