न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२५) :- पिंपरीतील नेहरूनगरच्या झिरो बॉईज चौकात गादी बनवणाऱ्या कारखान्याला आणि फर्निचरच्या दुकानाला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली.
या घटनेत दुकानाच्या वर असलेल्या इमारतीतील तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आल आहे. या आगीमध्ये चार दुकानात जळून खाक झाली आहेत. तसेच दुकानाच्या वर असलेल्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.










