न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२५ ) :- संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील शेडगे दिंडी क्रमांक तीनचे प्रमुख जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार (वय-७५) यांचे बुधवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांचे ते थोरले बंधू होत. संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायावर वादग्रस्त साहित्य प्रसिद्ध करणाऱ्यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. प्रसंगी त्यांनी न्यायालयीन लढाईही लढली.










