न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२५ ) :- हिंजवडी पोलीस स्टेशन येथे दिवसपाळी एसएचओ म्हणुन फिर्यादी कर्तव्यावर होते. तेव्हा एकाचा अटकपूर्व जामीन रद्द होणेबाबतचा तक्रारी अर्ज घेवुन आरोपी फिर्यादी यांचे समक्ष आला. फिर्यादीने त्याचा तक्रारी अर्ज स्विकारुन त्यास रिसीव्ह कॉपी दिल्यावर आरोपीने फिर्यादीस तुषार नथु जगताप गावातील व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मॅसेज करत आहे. तुम्ही त्याला आताच माझ्या समोर फोन करा, असे म्हणाला.
तेव्हा फिर्यादीने त्यास तुषार जगताप विरुध्द परंदवाडी पोलीस स्टेशन येथे वेगळा तक्रारी अर्ज किंवा तक्रार नोंदविण्यास सांगितले असता त्याने फिर्यादीस गावात काही झाले तर तुला सांगतो, मी कोण आहे तुला माहित आहे का? तुझी वर्दी उतरवतो, तुला दाखवतो, असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. फिर्यादीच्या अंगावर धावुन आला व फिर्यादीच्या अंगाशी झटापटी करुन त्यांची कॉलर पकडुन पॅन्टचे पाठीमागील बटन तोडुन महिला तक्रारदार, महिला पोलीस अंमलदार व पुरूष अंमलदारांसमक्ष फिर्यादीस घाणेरडया भाषेत शिवीगाळ करुन तुला खल्लास करतो, तुझ्यावर अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करुन तुझी वर्दी उतरवतो अशी धमकी दिली.
त्यावेळी पोलीस स्टेशन मधील इतर कर्मचारी हे त्यास समजावुन सांगण्यासाठी आले असता त्यांना देखील दमदाटी करुन फिर्यादी हे त्यांचे शासकीय कर्तव्य करीत असताना त्यांना धक्काबुक्की, अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमक्या देवुन हाताने इशारे करुन बाहेर भेट तुला दाखवतो असे म्हणाला, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार हिंजवडी पोलीस स्टेशन येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडला. ज्ञानेश्वर झोल पोलीस उप-निरीक्षक नेमणुक हिंजवडी पोलीस स्टेशन यांनी आरोपी मधुकर रतिकांत जगताप (वय ४७ वर्षे रा. सांगवडे ता. मावळ) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.