न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२५ ) :- चिखली – कुदळवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली असून, पालिका प्रशासनाने त्यात लक्ष घालून परिस्थिती सुधारावी आणि नागरिकांच्या उद्रेकाचा अंत बघू नये, असा इशारा मा. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी दिले असून, पालिका कार्यालयावर महिला आणि नागरिकांचा मोर्चा नेण्याची परिस्थिती आणू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
गेले पंधरा दिवस कुदळवाडीत प्यायच्या पाण्याला जनता तहानलेली आहे आणि वारंवार पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विनवण्या करूनही त्यात सुधारणा होत नाही.
त्या विरोधात प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्यात आला होता.त्यानंतर अधिकाऱ्यांना यादव यांनी भेटून परिस्थिती तातडीने सुधारा अन्यथा पालिका मुख्यालयावर मोर्चा घेऊन धडकी मारू असा इशारा यादव यांनी दिला आहे.
आधीच कुदळवाडीत महिलांच्या मनात मोठा रोष असून, त्याला निमित्त मिळून काही वावगे घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असे यादव यांनी म्हटले आहे.
प्रभाग कार्यालयाचे अधिकारी श्रीकांत कोळप, प्रीतम बाविस्कर, रमेश जिंतीकर, कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते.


















