न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २१ मे २०१९) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा संघ शिक्षावर्ग एसपीएम प्रशाला, यमुनानगर, निगडी येथे दि. १२ मे पासून सुरू झाला आहे. या वर्गात सुमारे २२५ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आज बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. वर्गाधिकारी विठ्ठल शिंदे, वर्ग कार्यवाह सचिन भोसले, प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडगाव, क्षेत्रीय प्रचार प्रमुख प्रमोद बापट या मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले. वर्गाचे पालक मकरंद ढवळे यांनी बुद्धवंदना घेतली. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने देशाला दिलेले योगदान व कार्य तरुण कार्यकर्ता स्वयंसेवकांना कथन केले.
याप्रसंगी क्षेत्र प्रचारक अतुल लिमये, भारतीय बौद्धजन विकास समितीचे प्रमुख कार्यकर्ते विजय कांबळे, रमेश जाधव व प्रदीप पवार हे उपस्थित होते. हा प्रशिक्षण वर्ग दि. २ जून रोजी संपणार आहे.











