न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- महापौर पद रिक्त असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून त्या रुग्णांना मिळणारी ५ हजार रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून तोडगा काढला जात नसल्याने रुग्ण मदतीपासून वंचित आहेत.
अनेक रुग्ण आर्थिक मदतीअभावी वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडे निधीसाठी धाव घेत आहेत. योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे अडचणीत येत आहेत. पैश्याअभावी रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून व सामाजिक बांधिलकीतून या निधीचे लेखापरीक्षण पूर्ण करून गरजू रुग्णांसाठी महापौर निधी देण्यास पुन्हा सुरुवात करावी, अशी मागणी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतीश कांबळे यांनी केली आहे.
दरम्यान, महापौरांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टचे कामकाज चालते. तत्कालीन महापौर उषा ढोरे यांची मुदत संपल्यापासून शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे पद रिक्त आहे. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या ट्रस्टचे कामकाज पूर्णपणे बंद आहे.












