न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०८ एप्रिल २०२५) :- पुणे महानगर विकास प्राधिकरणाने सेक्टर १२ मध्ये प्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पामध्ये पीएमआरडीएच्या सूचना डावलून अनेकजण आपल्या सदनिका भाडेतत्वावर देत आहेत. त्यामुळे या प्रकल्पात स्वतः सदनिकाधारकांऐवजी भाडेकरूंची संख्या वाढत आहे.
या प्रकल्पामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक सदनिका भाड्याने दिल्या असल्याचा आरोप तेथील रहिवाशांकडून केला जात आहे. याबाबत येथील काही सदनिकाधारकांनी पीएमआरडीए आयुक्तांना या पूर्वी निवेदन दिले आहे; मात्र आयुक्तांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून कारवाईदेखील होत नसल्याचे या सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पातील सदनिका विक्री करता येत नाही. तसेच भाड्याने देता येत नाही. प्रत्येक सदनिका धारकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– हिम्मत खराडे, उपायुक्त, जमीन व मालमत्ता विभाग…