न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- नैसर्गिकरित्य वाढ न झालेली केळी, चिकू, पपई, आंबा, अशा विविध फळांची सध्या सर्रास विक्री होताना दिसत आहे. या फळांना झटपट पिकविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे फळ पिकलेले व आकर्षक दिसत असले तरी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब अनेकदा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मात्र, अशा फळांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्याने बाजारात व हातगाड्यांवर अशी फळे विक्री होताना दिसत आहेत. आंबा, केळी, चिक्कू, पपई व सफरचंद यांना नैसर्गिकरित्या पिकण्यासाठी ठराविक वेळ लागतो. मात्र, बाजारात लवकर पोहोचवून इतरांच्या तुलनेत अधिक नफा मिळवण्याच्या हेतूने व्यापारी कॅल्शियम कार्बाइड, इथिलीन आणि इतर रसायनांचा वापर करतात.
कॅल्शियम कार्बाइड हे विशेषतः आंबे पिकविण्यासाठी वापरले जाते. या रसायनातून अॅसिटिलीन वायू तयार होतो, जो फळांना कृत्रिमरीत्या पिकवतो. ही प्रक्रिया जलद असली तरी ती फळांच्या पोषणमूल्यावर परिणाम करते व नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
भारतात कॅल्शियम कार्बाइडचा वापर अन्न पदार्थांसाठी प्रतिबंधित आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने याबाबत कठोर नियम लागू केले आहेत. तरीही, या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासन व बाजार समित्यांनी यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच, फळांच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि रसायनमुक्त फळांची खात्री देण्यासाठी कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर केलेली फळे खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, त्वचेच्या समस्या आणि श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. याशिवाय, या रसायनांमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे घातक घटक असू शकतात, जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी ही फळे अधिक धोकादायक ठरतात.
नैसर्गिकरित्य वाढ न झालेली केळी, चिकू, पपई, आंबा, अशा विविध फळांची सध्या सर्रास विक्री होताना दिसत आहे. या फळांना झटपट पिकविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे फळ पिकलेले व आकर्षक दिसत असले तरी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब अनेकदा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मात्र, अशा फळांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्याने बाजारात व हातगाड्यांवर अशी फळे विक्री होताना दिसत आहेत.
आंबा, केळी, चिक्कू, पपई व सफरचंद यांना नैसर्गिकरित्या पिकण्यासाठी ठराविक वेळ लागतो. मात्र, बाजारात लवकर पोहोचवून इतरांच्या तुलनेत अधिक नफा मिळवण्याच्या हेतूने व्यापारी कॅल्शियम कार्बाइड, इथिलीन आणि इतर रसायनांचा वापर करतात.