न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करण्यासंदर्भात लेखी पत्र दिले होते.
परिसरातील नाल्यांचे कॉँक्रीटीकरण झाले असले, तरी नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव, यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रहाटणी-पिंपळे सौदागर मधील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावी, असे काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.
आयुक्त हर्डीकर यांनी नाना काटे यांच्या मागणीनुसार पिंपळे सौदागर परिसरात स्टॉर्म वॉटर लाईन व नाल्यांच्या साफसफाईस आज मंगळवार (दि. २१) रोजी आरोग्य विभागाचे राकेश सौदाई यांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे, असे काटे यांनी सांगितले.











