न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19 जून 2020) :- चिंचवडच्या दळवीनगर झोपडपट्टी येथे झोपेतून उठविलेल्या तरुणाने सिगारेट दिली नाही . या कारणावरून चार जणांनी एका तरुणाला दगडाने मारहाण केली.
ही घटना बुधवारी (दि. 17) रोजी घडली. मधुकर मोतीराम शिरसाठ (वय 36 , रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 17) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विशाल ऊर्फ लंगड्या , बबलू शर्मा , सोनू शर्मा , भाव्या कांबळे ( पूर्ण नाव , पत्ता माहिती नाही ) अशी आरोपींची नावे आहेत.