न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जून. 2020) :- दापोडीत तिघांनी आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मृत्यू झालेल्या मित्राने तीन दिवसांपूर्वी तीन आरोपींपैकी एक असलेल्या अनिकेतला शिवीगाळ केल्याचे आरोपींचे म्हणने आहे. याचाच राग मनात धरून गुरुवारी दापोडीच्या हॅरीश पुलाखाली अनिकेतने इतर मित्रांच्या मदतीने अजयचा खून केला. विशेष म्हणजे मृत अजय व आरोपी हे अत्यंत जवळचे मित्र होते.
अजय शशिकांत सुर्यवंशी (वय- २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनिकेत गायकवाड, मिलिंद आल्हाट, आशु कोल्हे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून अनिकेत हा या सर्वांचा मित्र होता.
नितीन सयाजी शिंदे (वय- ३८) यांनी या घटनेप्रकरणी रात्री उशिरा भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.