न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19. जून 2020):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूने हैदोस घातलेला असतानाच या बाबीकडे नागरिक तर सोडाच आता अत्यावश्यक सेवेतील लोकांकडूनदेखील अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची बाधा झालेली होती. त्यामुळे त्या कर्मचा-याने स्वतःहून क्वारंटाईन होणे गरजेचे असतानाही तो कर्मचारी कामावर हजर होता.
आता त्या कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे त्याच्या सहवासात आलेल्या लोकांना महापालिकेने क्वारंटाईन केलेले आहे.