न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स विभागाच्या समन्वयीका डॉ. सुनिता पटनाईक यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
सोलापूर विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.डी. एन. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली “अनॉलिटिकल अँड पायटोकेमिकल स्टडी ऑफ मेडिकल प्लॅन्टस युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ लिव्हर सिरॉसिस अँजपर चरक संहिता चिकित्सा” या विषयावर शोधनिबंध सादर केला.
प्रतिभा ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेकडून डॉ. सुनिता पटनाईक यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मा. डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे, प्रशासन अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सर्वांनी डॉ. पटनाईक यांचे अभिनंदन केले.