न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून प्रशासनासह नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ प्रयत्नशील आहे. भाजीविक्रेते, फळविक्रेते, चहा वडापावसह इतर विक्रेत्याकडून ग्राहकांना व नागरिकांना कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये याची खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत फेरीवाल्यांची तपासणी करून त्यांना covid-१९ नकारात्मक प्रमाणपत्राचे वितरण आज महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारावकर, सुरज देशमाने, तुकाराम माने, प्रकाश साळवे, शामलाल सोळंकी, उमेश डोर्ले, राजेश माने, बालाजी लोखंडे, रफिक शेख, यासिन शेख, सुरेश देडे आदी उपस्थित होते.
फळे भाजीपाला आणि दूध विक्रेते, चहा-वडापाव व इतर विक्रेते यांच्याकडे ग्राहक येण्याची आकडेवारी मोठ्या प्रमाणात असून जर फेरीवाल्यांना करोनाची बाधा असेल तर त्यांच्यामुळे इतर ग्राहकांना होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने विक्रेत्यांची तपासणी सुरू केली असून याला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत बाराशे पेक्षा अधिक विक्रेत्यांनी तपासणी करून घेतली आहे. त्याचे नकारात्मक प्रमाणपत्र हे विक्री करत असणाऱ्या जागेवरती हातगाडीवर ठेवून तपासणी करता आलेल्या संबंधित अधिकारी व ग्राहकाना मी करोना नकारात्मक आहे हे दाखवण्यात येणार आहे. यामुळे सर्व विक्रेता आणी ग्राहक यांच्यामध्ये सकारात्मक वातावरण तयार होऊन नागरिकांना निसंकोच फेरिवल्याकडुंन खरेदी करता येणार आहे. आमचे रक्षणासह ग्राहकाचे रक्षण करण्यास फेरीवाला आता सज्ज झाला असुन सुरक्षित अंतर, हातमोजे, मुखपट्टी, वांरवार हात धूणे आदी काळजी घ्यावी, असे अवाहन महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यानी केले.