न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) :- राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. पुण्यात १३ ते २३ जुलै १० दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला तरी देखील कोरोना आटोक्यात आला नाही. धक्कादायक म्हणजे कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे.
तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत. पुणे महापालिकेत आतापर्यंत ३१३ कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, महापौरांसह १६८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर १३२ कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.