न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राजू विश्वनाथ बनसोडे (वय ४०, रा. सीएमई गेट समोर, जाधव चाळ, दापोडी) यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालाया समोरून ४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दुचाकी चोरीला गेल्याची भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवक बनसोडे यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच १४ ईजे ९३६६) पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेटसमोर असलेल्या जनसंपर्क कार्यालयासमोर ३ सप्टेंबर रोजी द्पारी साडेतीन वाजता पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक उघडून दुचाकी चोरून नेली. याबाबत ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.