न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- राज्यात अनेक काळापासून विविध संघटना आणि व्यक्तींकडून संभाजी बिडीचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी होत होती. या मागणीला अखेर यश आले असून हे नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी सांगितले.
साबळे म्हणाले, “संभाजी बिडी या कंपनीत ६० ते ७० हजार कामगार आहेत. या कंपनीला जवळपास ९० वर्षे झाली असून अनेक संघटनांच्या भावना लक्षात घेता आम्ही कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.”
“नव्या नावासाठी आम्ही चार ते पाच नावं सुचवली आहेत. कंपनीच्या नियमानुसार नव्या नावाला परवानगी मिळताच, लवकरच ते प्रसिद्ध केले जाईल. तसेच दरम्यानच्या काळात झालेल्या विरोधामुळे उत्पादनावर विपरित परिणाम झाला असून आता नाव बदलल्यानंतर आणखी परिणाम होण्याची शक्यता साबळे यांनी व्यक्त केली आहे.”