न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२२) :- नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) संपूर्ण देशभरात हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आणि कोरोनाच्या धोक्यामुळे फटाक्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पण ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्याची परवानगी देखील दिली आहे.
यात महत्वाची बाब म्हणजे यातही ३१ डिसेंबरच्या रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत. बंदी घालण्यात आलेल्या फटाक्यांची खरेदी आणि विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.