- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यासह मनसेचा पदाधिकारी अलगद जाळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- प्रदूषण नियंत्रण महाराष्ट्र महामंडळाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वीस लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यास एक लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपींमध्ये महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या रिजनल ऑफिसरचा देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २१) रात्री कल्याणीनगर येथील हॉटेल हयात येथे उघडकीस आला.
कैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह आशिष अरबाळे, पंढरीनाथ साबळे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे वाकडेवाडी येथील रिजनल ऑफिसर डाॅ. जितंद्र संघेवार अशीगुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी कपिल सुभाष पाटील (वय ४२, रा. लोढा बेलमेड, गहुंजे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे चिंचवड एमआयडीसी येथील ‘ स्टार इंजिनिअर्स इंडिया प्रा.ली. या कंपनीत नोकरीला आहेत. आरोपी आशिष अरबाळे हा देखील त्याच कंपनीत कन्सल्टंट म्हणून कामाला आहेत. त्याने कंपनीची गोपनीय माहिती आरोपी पंढरीनाथ साबळे याला दिली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीना अटक केली आहे.