- येत्या ३ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विलंब शुल्कासह करता येणार अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षा येत्या २९ एप्रिलपासून सुरू होणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या २ फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेतला जात आहे. मंडळातर्फे विद्यार्थ्यांना २३ डिसेंबर ते ११ जानेवारी आणि त्यानंतर १२ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती.
आता तिसऱ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणस्तव अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी येत्या ३ ते १३ फेब्रुवारी या दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करता येईल, असेही शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.