- मास्क, सॉनिटायझरचा वापर करणे बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत. कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. शहरातील पाचवी ते आठवीच्या महापालिका आणि खासगी शाळा मिळून ६४७ शाळा आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मास्क, सॉनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. शाळेत उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक असणार आहे. सकाळच्या सत्रात सकळी ८ ते ११ या वेळेत शाळा असणार आहे. तर दुपारच्या सत्रात १ ते ४ या वेळेत शाळा असणार आहे.
पाचवी ते आठवीचे शहरात १ लाख ३२ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. ३३११ शिक्षक या वर्गाना शिकवतात. शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यास अनेक अडचणी आल्या आहेत. आतापर्यंत २७०७ शिक्षकांची कोरोना तपासणी झाली आहे. त्यापेकी एकाही शिक्षकाला कोरोनाची लागण झालेली नाही. आतापर्यंत १४ हजार ६५ पालकांनी संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे अजूनही पालकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याचे वातावरण आहे.