- एक्स रे मशिन, सोनोग्राफी मशिनवर होता कर्जाचा बोजा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- कर्जाचा बोजा असलेली वैद्यकीय उपकरणे विकल्याप्रकरणी डॉक्टर आणि त्याच्या पत्नीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. डॉ.मनिष नंदलाल तरडेजा, रचना मनीष तरडेजा (रा. पाल्मस प्लॉट, नेरूळ, नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.
संदीप भोगीलाल शहा (वय ४८, रा. महर्षिनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रुबी हेल्थ केअर सर्व्हिसेसच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम करतात. आरोपींनी एक्स रे मशिन, सोनोग्राफी मशिनवर कर्जाचा बोजा असल्याची माहिती असूनही अशी यंत्रे विकली.