न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसें.) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (पीसीएससीएल) च्या वैधानिक लेखापरीक्षकपदी (ऑडीटर) चिंचवड येथील प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव गुरूवारी (दि. २०) होणाऱ्या “पीसीएससीएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. सन २०१७ -१८ च्या वित्तीय लेखा तपासणीत आणि अहवाल कामकाजासाठी प्रधान फडके या फर्मची निवड करण्यात आली आहे. त्यांना ४८ हजार ५०० रूपये या एकत्रित मानधनावर नियुक्ती दिली जाणार आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मेसर्स प्रधान फडके फर्मची निवड केली आहे. गुरूवारी (दि. २०) होणाऱ्या “पीसीएससीएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.