- ग्राहकांसाठी प्लॉट खरेदीची संधी; जलद ताबा देण्यावर समूहाचा भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- नवरात्रोत्सवाच्या पर्वात सिल्व्हर राइज ग्रुपच्या वतीने पाच नवीन प्लॉटिंग साइट्सचे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. प्लॉट खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा समूहाचा प्रयत्न आहे. कमी कालावधीत प्लॉटचा ताबा देण्याच्या उद्देशाने या नवीन साइट्स सादर करण्यात येत असल्याची माहिती समूहाच्या वतीने देण्यात आली.
प्लॉट खरेदी करताना ग्राहकांना पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, यावर सिल्व्हर राइज ग्रुपचा भर असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन प्रकल्प उपलब्ध करून देण्यासोबतच ताबा देण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी समूह प्रयत्नशील आहे.
नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सुरू होणाऱ्या या उपक्रमातून इच्छुक ग्राहकांना प्लॉट खरेदीच्या पर्यायांची माहिती घेता येणार आहे. मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांमध्ये प्लॉट खरेदीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी समूहाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सिल्व्हर राइज ग्रुपशी ९०९०६११७१७ या क्रमांकावर ग्राहकांना संपर्क साधता येणार आहे.

















