- भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यात भोसरी पोलीस ठाण्यातील एका गुन्हेगाराचा समावेश होता.
आरोपी पिंपरी-चिंचवड शहरात शासनाची कोणतीही परवानगी न घेता वास्तव्य करताना पोलिसांना आढळला. याबाबत पोलीस शिपाई सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वप्निल उर्फ सपन्या सुरेश भोई (वय १९, रा. शंकर काची चाळ वॉर्ड नबर ०३, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.