- तब्बल २२ कोटी १० लाख रुपये खात्यात जमा करण्यास पालिकेची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- शहरातील अर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जदारांकडून घेतलेली २२ कोटी १० लाख रुपये ही अनामत रक्कम सोमवार (दि. ५) पासून प्रत्येक अर्जदाराच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे.
महापालिकेने शहरातील अर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मागील वर्षी १७ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्या अर्जासोबत ५ हजार रूपयांचा डीडी जमा करण्यास सांगितले होते. पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरातील ४७ हजार ८७८ नागरिकांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ हजार ६६४ जणांचा सोडतीमध्ये नंबर लागला आहे. तर घर न मिळालेल्या नागरिकांची संख्या ४४ हजार २१४ एवढी असून त्यांचे ५ हजार रुपयाप्रमाणे २२ कोटी १० लाख रुपये महापालिकेकडे जमा आहेत.
ज्यांचा नंबर ड्रॉमध्ये लागला नाही अशा सर्व अर्जदारांचे पैसे सोमवार (दि ५) पासून त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.