- चर्चमध्ये गर्दी जमविणे आले अंगलट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- काळेवाडीतील राजवाडेनगर येथे जीजस लॉर्ड मिनिस्टरी चर्च आहे. त्या चर्चमध्ये आरोपी फादर आणि त्याच्या सहका-यांनी इस्टर संडेच्या दिवशी लोकांची गर्दी केली.
सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना साथरोग पसरविण्यास पोषक वातावरण निर्माण केल्याबाबत फादर आणि इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस शिपाई विठ्ठल सुरनर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फादर पॉल डेव्हिड सिल्वे व त्याच्या इतर सहका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.