- भोसरीतील घटना; तरुणावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून २०२१) :- भावाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाने महिलेच्या घरात घुसून शिवीगाळी करीत मारहाण केली. तसेच, त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील टीव्ही आणि इतर साहित्याचे नुकसान केले. शुक्रवारी (दि.१८) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे साडेआठ वाजता ही घटना घडली.
सचिन धहिरे (रा. बालाजीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा गौतम कसबे (वय. ४०, रा. बालाजीनगर भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीच्या भावासोबत प्रेमविवाह केला आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी आला. माझा भाऊ कोठे आहे, अशी विचारणा करीत त्याने शिवीगाळी केली. तसेच मारहाण केली. फिर्यादी यांचा मुलगा अमर याला जिवे मारण्याची धमकी दिली. घरातील टीव्ही आणि इतर साहित्याचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.