- आकुर्डीतील लोक अदालतीत होणार तक्रारींचा निपटारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- कोरोना नियमांचे पालन करून आकुर्डी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी (दि. २५) लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत लोकअदालत होणार आहे. या लोक अदालतमध्ये ७ हजार ८८७ थकबाकीदार मिळकत धारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
१३ सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत थकबाकीसह संपूर्ण मिळकतराची रक्कम भरल्यानंतर महापालिकेच्या शास्ती विलंब दंडच्या रकमेचे ५० टके सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत अवैध बांधकाम शास्तीस लागू नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या करसंकलन कार्यालयात थकबाकीसह एक रकमी मिळकतकर भरणा करावा, असे आवाहन करसंकलनाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.