न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जाने.) :- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणीथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बचतगटांच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरनास चालना मिळण्याकरीता खास महिलांसाठी इंद्रायणीथडी जत्रा (८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी) दरम्यान भोसरीतील गावजत्रा मैदानावर होणार आहे.
भोसरी तसेच पिंपरी चिंचवड व पुणे जिल्यातील ग्रामीण भागातील महिला किंवा बचतगटांद्वारे तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महिला व बचतगटांना उत्पादनाच्या विक्रीसाठी संयोजकांच्या वतीने मोफत स्टॉलची सेवाही या ठिकाणीउपलब्ध होणार आहे. या जत्रे दरम्यान विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हॅन्डमेड वस्तू, महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प, दैनंदिन तणाव मुक्तीसाठी योगा तसेच झुंबा प्रशिक्षण, ऍडव्हेंचर गेम्स, शालेय मुलांसाठी विविध गेम्स, विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम आदींची रेलचेल असणार आहे.
यात सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक महिला व बचतगटांनी स्वतःचे आधार कार्ड व पॅनकार्ड, बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच समाविष्ट महिलांची नावे व मोबाईल क्रमांकाची यादी घेऊन, आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन इंद्रायणीथडीच्या संयोजकांनी केले आहे.












