- सोन्याच्या दागिन्यांसह साहित्य लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दक्षिण महाळुंगे (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- खेड तालुक्यातील मोई येथील शिवतेजनगर, फलकेवस्ती परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संजय भारत कसबे (वय ४३, रा.पाषाण,) यांनी फिर्याद दिली आहे. कसबे यांचे आई-वडील मोई येथे राहतात. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० या कालावधीत ते पुण्याला गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोई येथील घराला लक्ष्य केले.
चोरट्याने घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट आणि बेडमधील साहित्य विस्कटून शोकेसच्या ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने तसेच एलसीडी आणि इतर साहित्य चोरून नेले. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक ढमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक जायभाय आणि पोलीस उपनिरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


















