- पतीविरोधात पत्नीने घेतली पोलिसात धाव..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२१) :- ५६ वर्षीय आरोपी पतीने पत्नीला स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसंच मुलीलादेखील मारहाण केली असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
यावेळी त्याने मद्यपान केलं होतं. मारहाण करत असताना आरोपी पतीने रागाच्या भरात पाठीचा कडाडून चावा घेतला असंही तक्रारीत सांगण्यात आलं आहे. ही घटना भोसरीमध्ये घडली असून पती आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत.
पती मद्यपान करून नेहमी पत्नीला मारहाण करत असे. मात्र पाठीचा कडाडून चावा घेतल्याने पत्नीची सहनशीलता संपली अन् पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला समज दिली आहे.