न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- नगरसेवक शैलेश मोरे यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आझम पानसरे व शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील एम्पायर इस्टेटमधील क्लब हाऊस क्रमांक १ येथे शनिवार (दि. १६) रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत हे शिबीर सुरु राहणार आहे. या शिबिरात मधुमेह, डोळे तपासणी, रक्तदाब, दातांची तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. शहरातील अनुभवी व वरिष्ठ डॉक्टरांची टीम या शिबिरात सहभागी होणार आहे.
तेंव्हा प्रभागातील तसेच परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून, आपल्या आरोग्याची तपासणी करावी व रक्तदान करावे, असे आवाहन नगरसेवक शैलेश मोरे यांनी केले आहे.