न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- पिंपळे सौदागर येथे थांबलेल्या महिलेचा महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विनयभंग केला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.
या प्रकरणी ३३ वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पाराजी होडगर (४२, रा. केशवनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.