न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- चिंचवड स्टेशन नजीकच्या संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) उड्डाणपुलावर चढणे आणि खाली उतरण्यासाठी दोन लूप (रॅम्प) तयार करण्यात येत आहे. या रॅम्प कामाचे ९५ टक्के पूर्ण झाले आहे. हे दोन्ही रॅम्प वाहतुकीस खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड लिंक रोडची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. काही किरकोळ कामे अपूर्ण आहेत. ते लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर वाहतूक विभागाकडून त्याची पाहणी झाल्यानंतर तो सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असणाऱ्या संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) उड्डाणरपुलावर चिंचवड लिंक रोड येथे उतरणे व पुलावर वाहनांना येण्यासाठी तयार केलेल्या लूपचे (रॅम्प) काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. सर्व काम पूर्ण होवून दोन्ही बाजूकडखील लूप सुरु केल्यानंतर चिंचवड लिंक रस्त्यावरील भाटनगर, चिंचवड येथील पीएमपीएमएल बस स्थानक चौकात होणारी वाहतूक कोंडी आटोक्यात आणण्यात यश येणार आहे. तर, काळेवाडी येथून पिंपरी आणि चिचवडच्या मुख्य बाजारपेठेत जाण्याची पर्यायी सोय होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१२ मध्ये बस रॅपीड ट्रान्झीट सिस्टीम (बीआरटी) हे वेगाने बसेस धावण्याचे मार्ग तयार केले. या मार्गावर काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बीआरटी रस्त्यावर चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथे संत मदर तेरेसा हा दोन किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल आहे.
सध्या या उड्डाणपुलाचा पिंपरी कॅम्प आणि चिंचवडमधील नागरिकांना फायदा होत नसल्याचे उड्डाणपुलावरुन लूप तयार करण्याची मागणी केली. त्यावर महापालिकेने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला लूप तयार करण्याचे काम २०२० मध्ये हाती घेतले. सध्या लुपचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून महिनाअखेर उर्वरीत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावरुन चढणे व उतरण्यासाठी दोन्ही बाजूला बांधलेल लूपचे (रॅम्प) काम प्रगतिपथावर आहे. दोन लूपचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. वाहतूक विभागाकडून त्याची पाहणी झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल.
– विजय भोजने, कार्यकारी अभियंता – महानगरपालिका…