न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये २०२५-२६ या हंगामाकरिता खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यात २३ वर्षाखालील खेळाडूंच्या चाचणीस सुमारे दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच अकॅडमीचे सर्वेसर्वा दिलीप वेंगसरकर, अकॅडमीचे प्रशिक्षक मोहन जाधव, प्रमोद लिमण, शादाब शेख, राहुल वेंगसरकर, भूषण सूर्यवंशी, चंदन गंगावणे आणि डॉ विजय पाटील उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ते खेळाडूंना म्हणाले की, निवड होणाऱ्या खेळाडूंना प्रचंड मेहनत करावी लागेल हे निश्चितच पण, निवड होणार नाही अशा खेळाडूंनी देखील निराश न होता अधिक जोमाने पुन्हा तयारी करून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज व्हावे. क्रीडा नैपुण्याबरोबरच तंदुरुस्ती राखण्यासाठी अधिक कष्ट घेणे गरजेचे आहे.
















